महापुरुषांचे विचार सर्व समाजासाठी प्रेरणादायी :- रचनाताई गहाणे

0
32

अर्जुनी मोर.दि.16 :- सुसंस्कारीत पिढी तयार होण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज आहे. भगवान बिरसा मुंडा फार कमी वर्ष जगले.वयाच्या 25 व्या वर्षातच त्यांनी केलेली सामाजिक क्रांती इतिहास होवुन गेली. भगवान बिरसा मुंडानी मद्यपान व मासाहाराला प्रचंड विरोध केला. व्यसनाधीन समाज अधोगती कडे जातो.त्यासाठी महापुरुषांच्या आदर्शाने व्यसनमुक्त समाज निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येकानी समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे. भगवान बिरसा मुंडा चे कार्य आदिवासी समाजासोबतच इतर समाजासाठीही प्रेरणादायी आहेत.असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी केले आहे.
जयसेवा आदिवासी मंडळाचे वतीने मौजा मालकनपुर येथे ( ता.१२ )महामानव विर भगवान बिरसा मुंडा यांचे पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण व आदिवासी मेळाव्या प्रसंगी रचनाताई गहाणे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आदिवासी सेवक, पंचायत समिती सदस्य नाजुक कुंभरे होते.उदघाटन जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांचे हस्ते करण्यात आले.स्मृतीपुजक म्हणुन मुर्तीदाते लैलेश्वर शिवनकर, ध्वजारोहक संचित वाळवे, सरपंच लक्ष्मीकांत नाकाडे, तुलाराम मारगाये, व्यंकट खोब्रागडे, कैलास ईस्कापे, एल.आर.बोरकर, पंचायत समिती सदस्या शालिनी डोंगरवार, सविता कोडापे, अर्जुनी मोर. च्या नगरसेविका शिला उईके, उपसरपंच उज्वला डोंगरे, अनिल कापगते, संदिप भैसारे, अस्मिता पाटणकर, नरेश खंडाईत, मार्कंड पाटणकर, दिपंकर उके, शामराव नाकाडे, गावातील प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आदिवासी विविध कार्यकारी संस्था बाराभाटी चे उपाध्यक्ष लैलेश्वर शिवनकर यांनी दान दिला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाला दिशा देणारे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक चैनसिंग सापा यांनी तर संचालन राजेश कोडापे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयसेवा आदिवासी मंडळाचे भविंद्र मडावी, किरण मडावी,जयदेव पेंदाम, अनिता सयाम,सुदेश वाळवे, प्रभा वट्टी, बाबुलाल सापा, ममिता वाळवे, संजय वट्टी, डिलेश पेंदाम, गिता कल्लारी , पुष्पा वाळवे, व अन्य कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.