33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ तिरोड्यात ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी

तिरोड्यात ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी

0
31

तिरोडा,दि.२- राज्य सरकारच्या सरोवर प्रकल्प योजनेअंतर्गत येथील qसगाडा तलावाचे सौंदर्यीकरण तसेच नगर परिषदेद्वारा नवनिर्मित सभापती कक्षाचे लोकार्पण समारोह येत्या शुक्रवारी माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या हस्ते दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे. ही सर्व विकास कामे ७ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून केली जाणार आहेत. विशेष अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, आमदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अजयसिंह गौर, उपाध्यक्ष ममता बैस, माजी आमदार दिलीप बन्सोड, डॉ. अविनाश जायस्वाल, राजू जैन, राजलक्ष्मी तुरकर, सभापती उषाताई qकदरले, नगर परिषदेचे पदाधिकारी व नगरसेवक तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नगर परिषद कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य अधिकारी प्रशांत उरकुडे यांनी केले आहे,

blank