शिक्षामहर्षी श्रद्धेय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी

0
75

शिक्षणमहर्षी विदर्भाचे शुभqचतक श्रद्धेय श्री. लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचे संपूर्ण जीवन सत्य, इमानदार, गंगासारखे पवित्र आणि आरशाप्रमाणे स्वच्छ, साफ होते. श्रद्धेय गुरुजी एक निस्वार्थ समाजसेवक व मिलनसार व्यक्तित्व यांचे सावकार होते. तसेच एक कुशल संघटक होते. शिक्षण क्षेत्रापासून तर राजनीती सारख्या कार्याचा परिचय गुरुजींनी कुशलतेने दिला.
महावकी भवभुती यांचा जन्म पदमपूर, आमगाव येथे झाला. या पवन भूमीवर गुरुजींनी भगीरथ प्रयत्न करून मागासलेल्या क्षेत्रात शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला. श्रद्धेय श्री. लक्ष्मणराव मानकर गुरुजींचा जन्म ४ फेबु्रवारी १९२९ ला तुमखेडा या गावात झाला. त्यांचे वर्ग ४ पर्र्यंतचे शिक्षण आमगाव व त्यानंतरचे शिक्षण गोंदिया येथे झाले.
सन १९५० मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर आपले संपूर्ण जीवन गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील मागासलेल्या क्षेत्रात ज्ञानसंग्रह व ज्ञानप्रसार अशा महत्त्वपूर्ण कार्यासाठी खर्च केले. मागासलेल्या क्षेत्रातील विद्याथ्र्यांना शिक्षण घेण्याचे कोणतेही साधन नव्हते. याकरिता श्रद्धेय गुरुजींनी सन १९५० मध्ये महाकवी भवभुती यांच्या नावाने ‘भवभुती शिक्षण संस्थाङ्क स्थापन केली. आमगाव मध्ये आदर्श विद्यालय प्रारंभ करून त्यांच्या प्रेरणेनी आणि इच्छेनी चांगले प्रतिभाशाली आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक तयार केले.
सन १९६२ ते १९७२ या कालखंडात श्रद्धेय गुरुजी हे राजनीती मध्ये या क्षेत्राचे मार्गदर्शक होते. आपल्या कालखंडात शेतकèयांची समस्या, सहकार क्षेत्र, आदिवासी समस्या, बिडी कामगारांची समस्या, गोवध बंदी, सरकारी कर्मचाèयांची समस्या, देवरी आदिवासी विकास खंड घोषणा, नदी, नाले, बंधारे ची समस्या इत्यादी समस्यांकडे लक्ष केंद्रित करून उपाय योजना केली.
ते लोकांचे इतके लाडके होते की त्यांना लोकांनी भंडारा लोकसभा मतदार क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून दिले. त्यांनी वनवासी लोकांना आर्थिकदृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या विकसीत करण्यासाठी प्रयत्न केले. राजनीतीत राहून त्यांनी शिक्षण प्रसार कार्यात गतिशील प्रवाह आणले. दि. २जुलै १९९२ मध्ये ग्राम चोपा मध्ये शिक्षणाचा मार्ग नव्हता तेथे रवींद्र विद्यालय नावाची शाळा सुरू केली. सन १९६९ मध्ये आमगाव क्षेत्रात भवभुती महाविद्यालयाची स्थापना केली. सन १९७० मध्ये ग्राम कुèहाडी येथे रामकृष्ण विद्यालयाची स्थापना कुèहाडी येथे केली.
सन १९८७ मध्ये औषधी निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम सुरू केला. येथून पदविका प्राप्त धारक विद्याथ्र्यांनी खेडेगावात जाऊन औषधालय सुरू केले. त्यामुळे गरीब लोकांना इकडे-तिकडे भटकावे लागले नाही.
या संस्थेनी आपल्या प्रगतीमध्ये अनेक नवीन अध्याय जोडले आणि आज ही संस्था ६५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या संस्थेचे जनक श्रद्धेय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी संपूर्ण प्रदेशात एक सशक्त राजनेता म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकत्र्याना जोडण्याचे आणि समोर वाढविण्याचे कार्य त्यांनी सदैव केले.
या संस्थेला अनेक माननीय गणमान्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभले. त्यामध्ये बाळासाहेब देवरस यांच्या सारख्या विभूतीचा समावेश आहे. आज श्रद्धेय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती निमित्त त्यांच्या आदर्शांना आत्मसात करणे त्यांच्या प्रती भावपूर्ण श्रद्धांजली असेल.
प्रस्तुती: डॉ. डी.के. संधी (प्राचार्य)
श्री लक्ष्मणराव मानकर इस्टिट़््युट ऑफ फार्मसी, आमगाव