श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती ४ रोजी

0
24

आमगाव दि.२: शिक्षणमहर्षी श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती ४ फेबु्रवारी ला दुपारी १२ वाजता भवभुती महाविद्यालय आमगाव येथे साजरी होणार आहे. वेल्लूर तामिलनाडू चे पूज्य डॉ. अप्पाजी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक हक्क संरक्षण मंत्री ेिगरीष बापट जयंती समारोहाचे उद्घाटन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, भाजप प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी अतिथींच्या हस्ते मेजर ध्यानचंद क्रीडा सभागृहाचे लोकार्पण, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील श्रद्धेय मानकर गुरुजींचे सहयोगी नत्थूलाल ठाकूर, प्रेमलाल चौधरी, बाबुलाल अग्रवाल, मोतीलाल कुकरेजा, प्रेमलाल बोपचे, बाबुलाल उपराडे यांचा सत्कार होणार आहे. त्याचप्रमाणे गुणवंत विद्याथ्र्यांना ‘संधी टॉपर्सङ्क अवार्ड, भवभुती महाविद्यालयाच्या उत्कृष्ट विद्याथ्र्याना पुरस्कार आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
जयंती समारोहात मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन भवभुती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी अध्यक्ष केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक मंडळ व समारोह संयोजक डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी केले आहे.