शेतातील पिके करपू लागली,पाण्यासाठी जमिन आसुसली
गोंदिया,दि.9- सिंचनाच्या बाबतीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी भगीरथ ठरलेल्या तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा िसचन योजनेचा विद्युत पुरवठा महावितरणने गेल्या शनिवारपासून (दि. ५) खंडित केेलेला विज पुरवठा आज पाच दिवस लोटूनही पुर्ववत झालेला नाही.पाणी न मिळाल्याने धान पिक सुखण्याच्या मार्गावर आले आहेत.कवलेवाडा येथील प्रगतीशिल शेतकरी सुशील रहांगडाले यांनी सांगितले की,गेल्या चार दिवसापासून पाणी नसल्याने शेतातील जमीन कोरडी पडू लागली आहे.तर पिक ही हळूहळू पिवळे पडू लागले आहे.त्यामुळे काय करावे काहीच कळत नाही.आधीच खरीपाचे पीक कमी आले त्यातच केंद्रावर विकलेल्या धानाचा चुकाराच परिसरातील शेतकर्याना न मिळाल्याने पाणी पट्टीकर देणार कसा असा प्रश्न उपस्थित करुन सरकार शेतकरी वगार्ची पिळवणुक करीत असल्याची व्यथा व्यक्त केली. संबधित विभागाने सुध्दा हात टेकले असून पैसाच नाही तर आम्ही विज बिलाचा भरणा करणार तरी कुठून असा प्रश्न उपस्थित करीत आम्ही करावे काय असा प्रतिप्रश्चच उपस्थित केला.
फेबुवारी महिन्याअखेर पर्यंत 9 लाखाची थकबाकी असून या मार्चमहिन्यातील पकडून ती १५ लाख रुपयांची होणार आहे. वीजबिल थकविल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, या दोन्ही जिल्ह्यातील दीड हजार एकरातील रब्बी पिके धोक्यात आली असून बळिराजा संकटात सापडला आहे. उल्लेखनीय म्हणजे जनकल्याणाच्या बाता हाकणाèया शासनातील ऊर्जा मंत्र्यानेदेखील सत्ताधारी आमदाराच्या विनंतीला धुडकावून लावत शेतकèयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
१५ लाख रुपयाचा भरणा शिल्लक आहे. आधीच या तालुक्यात पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. शेतकरी त्यामुळे हतबल असल्याने पाणसारा वसुलीवर परिणाम होत आहे. महावितरणने कुठलीही विचारणा न करता आणि वीज पुरवठा खंडित न करण्याचे तोंडी आश्वासन दिलेले असतानाही उपसा qसचन योजनेचा पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. रब्बी पिकाचे उत्पादन आल्यानंतर शेतकरी पाणीकराचा भरणा करतील आणि आम्ही ती रक्कम जमा करू तोपर्यंत थांबा, असे सांगितले होते. परंतु, त्यांनी थोडी तरी दया दाखविली नाही असे धापेवाडा उपसा सिंचनचे कार्यकारी अभियंता यासटवार यांचे म्हणने आहे.
शेतकèयांनी धापेवाडा उपसा qसचन योजनेच्या भरवशावर रब्बी पिकांची लागवड केली. मात्र, आता पाण्याचा पुरवठाच बंद झाल्याने शेतकèयांची धाकधूक वाढली. रब्बी हंगामातील उत्पादन हातातून जाण्याची भीती शेतकèयांनी व्यक्त केली.

मला माहित नाही,बर झालं सांगितल-कलेक्टर
धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या टप्पा 1 मधून शेतक्र्याना सिंचनासाठी पाणी दिला जातो.परंतु गेल्या पाच दिवसापासून उपसा सिंचन योजनेचे विज बिल महावितरणकडे जमा न झाल्याने महावितरणने विज पुरवठाच खंडीत केल्याने पाच दिवसापासून पिके पाण्यापासून वंचित आहेत याबद्दल जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यंवशी यांना विचारणा केली असता त्यांनी बेरार टाईम्सकडे स्पष्टपणे मला याबद्दल काहीच कल्पना नाही.कुणी माहिती ही दिली नाही असे सांगत आपण मला हा विषय सांगितलं बर झाले लगेच मी धापेवाडा उपसा सिंचनचे कार्यकारी अभियंता आणि महावितरणच्या अधिकार्याना लगेच पाचारण करतो असे सांगितले.