42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आमदार राणाच्या कार्यालयाची भाजप कार्यकत्यार्नी केली तोडफोड

आमदार राणाच्या कार्यालयाची भाजप कार्यकत्यार्नी केली तोडफोड

0
29

blank

अमरावती- बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड करुन राज्याताली सत्ताधारी भाजपने आपणही काही कमी नाही असे दाखवून दिले आहे.मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे आ.राणा यांच्या कार्यालयात आज सकाळी आले आणी त्यांनी अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दाचा तीव्र निषेध नोंदवित राणा यांना शिविगाळ करीत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.13 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमात राणा यांनी पालकमंत्री पोटे यांना मारहाण करण्यात आपण मागेपुढे करणार नाही त्यांनी विनाकारण राजकारण करु नये असे म्हटले होते त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले.त्यानुसार आज आधी शहर भाजपने बैठक घेऊन रणनिती ठरविली त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वडविला आणि तोडफोड केल्याची सुत्रांनी सागितले.आमदार रवी राणा यांनी पोलीस ठाणे गाठले असून कार्यालय तोडफोडीची तक्रार देणार आहेत.

blank