28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ रेल्वेगाडीच्या धडकेत गणखैराचे सरपंच ठार

रेल्वेगाडीच्या धडकेत गणखैराचे सरपंच ठार

0
472

गोरेगाव -तालुक्यातील गणखैरा येथील सरपंच संतोष आदमने हे शेतीची कामे करून घरी परत जात असताना रेल्वेगाडीच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  (ता. 2) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर गणखैरा गावशिवारात घडली.संतोष आदमाने यांची गावालगत शेती असून शेतात खरीप हंगामातील भात रोवणीची कामे सुरू असल्याने ते शेताकडे गेले होते. दरम्यान, त्यांच्या शेताजवळूनच गोंदिया – चांदाफोर्ट रेल्वेमार्ग असून दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ते रेल्वेरुळ ओलांडत असताना चंद्रपूरकडून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने त्यांना चिरडत नेले. ज्यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. सरपंच संतोष आदमाने यांच्या अपघाती मृत्यूमुळे गणखैरा गावात शोककळा पसरली आहे.

blank