42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ रास्ता सुरक्षा अभियान अंतर्गत परिवहन विभागाच्या वतीने गोंदियात बाईक रॅली

रास्ता सुरक्षा अभियान अंतर्गत परिवहन विभागाच्या वतीने गोंदियात बाईक रॅली

0
59

blank

गोंदिया, दि.१८ जानेवारी :येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दि.१६ जानेवारी रोजी गोंदियात बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली.वाढत्या अपघातावर आळा घालण्यासाठी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने गोंदिया शहरात हेल्मेटचे महत्व पटवून देण्याकरीता बाईक रॅली काढण्यात आली.

अनेकदा वाहन अपघातात दुचाकी चालक वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करीत नाही, तर अपघात होताच वाहन चालकाच्या डोक्याला गंभीर इजा होते. आणि एखाद्या वेळी त्याचा मृत्यू होतो.त्यामुळे दुचाकी वाहने चालविताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहने चालविताना सीट बेल्टचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालावा असा सल्ला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी दिला आहे. या रॅलीत परिवहन विभागाचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

blank