30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ हिपॅटायटीस  पंधरवडा निमीत्ताने  प्रभातफेरी जनजागृती रॅली

हिपॅटायटीस  पंधरवडा निमीत्ताने  प्रभातफेरी जनजागृती रॅली

0
88

blank

सही समय पर टिका लगवाये, हिपॅटायटीस से बचे ह्या घोषणाने शहर दुमदुमले

गोंदिया,दि.२८ः पावसाळ्यात आल्हाददायक वातावरणासोबतच विविध आजार देखील डोकावतात,  शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात यकृताची मोठी भूमिका असते.पावसाळ्यात आल्हाददायक वातावरणासोबतच विविध आजार देखील डोकावतात तर या आजारांचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतात.शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात यकृताची मोठी भूमिका असते. तर अयोग्य खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक लोक हिपॅटायटीस सारख्या गंभीर आजारांना बळी पडतात.हळूहळू हा आजार शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करू लागत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी आजच्या दिवसाच्या अनुषंगाने माहीती दिली आहे.
दरवर्षी माहितीअभावी या आजाराच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये हिपॅटायटीसच्या संसर्गाबाबत जनजागृती करणे हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे.आपणास आश्चर्य वाटेल की यकृताशी संबंधित या संसर्गामुळे दरवर्षी 13 लाख लोक आपला जीव गमावतात. लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ह्या वर्षी 22 ते 28 जुलै दरम्यान हिपॅटायटीस सप्ताह दरम्यान हिपॅटायटीस आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.या आजारात यकृताला सूज येऊन अन्न पचण्यात अडचणी येतात.अशात त्याची लक्षणे वेळीच ओळखून उपचाराकडे वाटचाल करणे गरजेचे असल्याचे जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी म्हटले आहे.

 राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस (कावीळ) नियत्रंण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा आरोग्य प्रशासनके.टी.एस.सामान्य रुग्णालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक हिपॅटायटीस दिन व सप्ताह अनुशंगाने दि.28 जुलै प्रभातफेरी माध्यमातुन जनजागृती करण्यात आली. जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीला जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे  व कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ.पोषणलाल बिसेन यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उदघाटन केले.प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून ईंदिरा गांधी स्टेडियम मैदान-बाजार चौक-जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरी द्वारे समाजामध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक विध्यार्थ्यानी  घेऊन फेरीत सहभाग घेतला.

प्रभातफेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजने विद्यार्थी यांनी जनजागृती केली.प्रभातफेरी दरम्यान निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती ज़ायस्वालवैद्यकीय अधिकारी डॉ.अजय घोडमारे,डॉ.मिना वट्टी,डॉ.स्वर्णा उपाध्याय,एन.व्ही.एच.सी.पी कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक संजय बिसेनजिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात,प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंगला तुरकर,उज्वला सेलोकर,नेहा टेंभरे,डॉ.स्नेहा वंजारी,डॉ.कांचन भोयर,सपना खंडाईत,अर्चना शिवणकर,रेखा कानतोडे,संध्या शंभरकर,तार्केश उके,बर्बा बोहरे,स्वाती पाटील यांचे समवेत के.टी.एस.सामान्य रुग्णालयाचे इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमात सुत्रसंचालन संजय बिसेन व आभार प्रदर्शन सपना खंडाईत यांनी केले.

blank