
सालेकसा,दि.०८ःओबीसी समाजाच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना ही अत्यावश्यक असल्याचे तसेच ओबीसी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा लाभ घ्यावा या मुख्य उद्देशाला घेऊन २ आँगस्टपासून ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोराम व ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेचे तालुक्यातील साखरीटोला येथे(दि.०६)ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघासह विविध संघटनाच्यावतीने स्वागत करण्यात आले.याप्रसंगी यात्रेचे संयोजक उमेश कोराम यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.साखरीटोला येथील चौकात झालेल्या काॅर्नर सभेत कोराम यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना का महत्वाची आहे,यावर मार्गदर्शन केले.यानंतर साखरीटोला येथून मोटारसायकल रॅलीने यात्रा आमगावकडे रवाना करण्यात आली.यात्रेचे स्वागत ओबीसी संघर्ष समितीचे मनोज शरणागत,डाॅ.संजय देशमुख,तिरखेडी सरपंच श्रीमती प्रियाताई शरणागत,भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार,सातगांव सरपंच नरेश कावरे,राजू काळे,संजय बारसे,संजय बोहरे,योगेश फुंडे,मोहन वाड़तकर,मोहन दोनोडे, कृष्णाजी पटले,रवि कटरे,रेवत मेंढे,कमलेश बाेपचे,सुभाष बिसेन,कृपाल बहेकार,शैलेश दोनोडे,प्रेषित बिसेन,रेखलालजी गौतम,श्री.येड़े,श्री.हरिनखेडे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.




