37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पिक नुकसानीच्या मोबदला यादीत पात्र शेतकर्‍यांचा समावेश करा-माजी सभापती मनोज बोपचे

पिक नुकसानीच्या मोबदला यादीत पात्र शेतकर्‍यांचा समावेश करा-माजी सभापती मनोज बोपचे

0
78

blank

गोरेगाव,दि.३०ः तालुक्यातील कालीमाटी गाव परिसरात रब्बी हंगामात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाल्याने कृषी विभागाने प्रत्यक्ष शेत पाहणी न करताच ज्यांच्या शेतात रब्बी हंगामातील पिकच घेतले गेले नाही अशांची नावे नुकसानग्रस्ताच्या यादीत टाकल्याने वास्तविक पात्र असलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची नावेच यादीत नसल्याने त्यांना फटका बसला आहे.रब्बी हगांमातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्यावतीने देण्यात येणार्‍यां मोबदला याादीत खर्या नुकसानग्रस्तांची नावेच नसल्याने ती यादी रद्द करुन खोटी माहिती देणार्यावर कारवाई करण्याची मागणी गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी केली आहे.

कालीमाटी गावपरसिरात रब्बी हंगामाच्यावेळी अवकाळी पाऊस झाल्याने पिके लावलेल्या शेतकर्‍यांच्या शेतपिकाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले होते.मात्र प्रत्यक्ष पाहणी न करताच अर्ज सादर केलेल्यांचे पंचनामे तयार करुन यादी सादर करण्यात आल्याने पात्र असलेल्या शेतकर्‍यांची नावे नुकसानभरपाईच्या यादीमध्ये आलीच नसल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.विशेष म्हणजे ज्यांनी शेतात पीक लावले नाही, अशा शेतकर्‍यांची नावे यादीत बघावयास मिळाली.यामुळे पंचायत समितीचे माजी अध्यक्ष मनोज बोपचे यांनी कृषी विभागाला सदर त्वरित यादी रद्द करुन नवीन यादी तयार करण्याची मागणी केली आहे.

माहितीनुसार, रबी पिकांच्या नुकसान भरपाई करण्याकरीता नुकसानग्रस्तांची यादी तयार करण्यासाठी गावात सर्वेक्षण केले जाते.त्याची जबाबदारी स्थानिक कृषी सेवक,सचिव,तलाठी आणि सदस्यावर असते.परंतु कालीमातीमधील सर्वेक्षण काम कृषी सेवक आणि ग्राम पंचायत ऑपरेटरवर सोडले गेले.ज्यांचे परिणाम यादी तयार करतांना मोठी गडबड झाल्याने नुकसान झालेल्याची नावे नाहीत,त्यामुळे फरेतपासणी करुन यादी तयार करुन न्याय देण्याची मागणी बोपचे यांनी केली आहे.

blank