गोंदिया,दि.०१ :शहरातील मुख्य बाजारात लोकांची नेहमी वर्दळ असलेल्या अशा गजबजलेल्या गोरेलाल चौक ठिकाणी दुकानाच्या पहिल्या माळावर इमारतीच्या भिंतींचे निर्माण कार्य सुरू होते. दरम्यान निर्माण कार्य सुरू असलेल्या दुकानाची भिंत अचानक येथे काम करत असलेल्या मजुराच्या अंगावर कोसळल्याने या भिंतीच्या ढिगार् यात काम करीत असलेल्या दोन कामगारापैकी एकाच्या मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज बुधवारी गोंदियातील मुख्य बाजारपेठ गोरेलाल चौक येथे दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. अक्षय कुमार पाचे रा. बिरसी ता. गोंदिया असे या घटनेतील मृत मजुराचे तर जितेंद्र बाहे रा. डांगोर्ली ता. गोंदिया असे या घटनेतील गंभीर जखमी मजुराचे नाव आहे.
जखमीला तातडीने गोंदिया येथील केटीएस जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार गोंदियातील मुख्य बाजारपेठेत अनिल कुमार जैन आणि अंजली स्टोअर्स यांच्या मालकीच्या असलेल्या कापड दुकानाच्या पहिल्या माळ्यावर भिंतीचे बांधकाम गेल्या एका आठवड्यापासून सुरू होते.आज नेहमीप्रमाणे या बांधकाम कामावरील कामगार यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.पण दुपारी १२:३० च्या सुमारास ही निर्माणधीन भिंत अचानक कोसळली त्यामुळे या भिंतीच्या ठिकाणी दबून एक कामगाराच्या मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला.मृत व जखमी कामगाराच्या नातेवाईकांनी अनिलकुमार जैन यांच्याकडे मोबदल्याची मागणी केली असून शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक किशोर पर्वते यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीत सांभाळली.





