विजयवाडा (आंध्र प्रदेश),दि.3 ऑक्टोबर:विजयवाडा येथे आयोजित 6 वी ज्युनिअर व सिनिअर “सी” नॅशनल योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025–26 मध्ये दिव्य योग फाउंडेशनच्या संस्थापिका योगाचार्या दिव्या नितीन भोजवानी यांनी आपल्या वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत 23 राज्यांच्या स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि क्षेत्राचा गौरव वाढविला.
ही स्पर्धा 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पी.बी. सिद्धार्थ आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, विजयवाडा येथे पार पडली. या स्पर्धेचे आयोजन योगासन भारत यांनी केले होते तर योगासन स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ आंध्र प्रदेश यांनी यजमानपद भूषविले.समारोप समारंभातील पुरस्कार वितरण सोहळ्याला कोल्लु रविंद्र मंत्री, मद्य व खनिज भूगर्भ विभाग, आंध्र प्रदेश सरकार,केसिनेनी सिवानाथ “चिन्नी” खासदार, विजयवाडा,बोंडा उमामहेश्वर राव आमदार, विजयवाडा (केंद्रीय),डॉ. जयदीप आर्य महासचिव, योगासन भारत व वर्ल्ड योगासन,उदित शेत अध्यक्ष,योगासन भारत,डॉ.जी.लक्ष्मीषा – जिल्हाधिकारी (कलेक्टर), एन.टी.आर.,एस.व्ही.राजशेखर बाबू पोलीस आयुक्त,विजयवाडा यांच्यासह आयोजन समिती व योगासन भारत प्रतिनिधी गोट्टीपाटी वेंकटा रामकृष्ण प्रसाद मानद अध्यक्ष,ए. राधिका अध्यक्ष,पी. प्रेमकुमार महासचिव,राजशेखर रेड्डी उपाध्यक्ष,कोन्गारा साई जिल्हाध्यक्ष,सौ.गोमती विश्वनाथन कार्यकारी सदस्य,योगासन भारत,जयेश जोशी संयुक्त सचिव उपस्थित होते.राष्ट्रीय स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), फिट इंडिया, खेलो इंडिया व भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने पार पडली. या स्पर्धेचे उद्दिष्ट योगासनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर नवी ओळख व बळकटी देणे हे होते.
या स्पर्धेत योगाचार्या दिव्या नितीन भोजवानी यांनी आपल्या अद्वितीय योगाभ्यास व साधनेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी, शिष्यांनी व दिव्य योग फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी आनंद व अभिमान व्यक्त केला.योगाचार्या दिव्या नितीन भोजवानी यांनी हे यश आपल्या गुरुजनांना, विद्यार्थ्यांना व सातत्यपूर्ण योगाभ्यास साधनेला समर्पित केले.




