25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राजकीय गोंदिया, तिरोड्यात आेबीसी जनरल,आमगाव पुन्हा थांबले

गोंदिया, तिरोड्यात आेबीसी जनरल,आमगाव पुन्हा थांबले

0
114

नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर; लवकरच होणार निवडणूक
गोंदिया ः मुंबई येथील मंत्रालयात सोमवारी (ता. ६) नगर परिषद व नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यात गोंदिया आणि तिरोडा या दोन्ही नगर परिषदेवर आेबीसी प्रवर्ग असे आरक्षण निघाले आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून होते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर कहीं खुशी कहीं गम असे वातावरण पाहायला मिळाले.
२०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. दोन टप्प्यात या निवडणुका पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा आणि नगर पंचायतींचा समावेश असेल. गोरेगाव आणि सालेकसा नगर पंचायतीच्या निवडणुका होणार असून, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी या नगर पंचायतीच्या निवडणुका २०२७ मध्ये होणार आहेत. गोरेगाव नगर पंचायत अनुसूचित जमाती आणि सालेकसा नगर पंचायतीसाठी सर्वसाधारण असे आरक्षण निघाले आहे.

नगरपंचायतींचे आरक्षण
१) देवरी : अनुसूचित जाती
२) गोरेगाव : अनुसूचित जमाती
३) अर्जुनी मोरगाव : अनुसूचित जमाती महिला
४) सडक अर्जुनी : सर्वसाधारण महिला
५) सालेकसा : सर्वसाधारण

आमगाव नगर परिषदेचा तिढा कायम
जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या आमगाव नगर परिषदेचा तिढा सुटलेला नाही. हे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीवरून स्पष्ट झाले असून, येथील नागरिकांना निवडणुकीकरिता आणखी किती वर्षे वाट बघावी लागेल, असा सूर नागरिकांमध्ये आहे.

blank