25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home शैक्षणिक देवरी येथे मूल्यवर्धन प्रशिक्षणाची सांगता

देवरी येथे मूल्यवर्धन प्रशिक्षणाची सांगता

0
212

देवरी, दि.०९- स्थानिक पी.एम.श्री. जि. प. हायस्कूल गेल्या मंगळवार पासून सुरू असलेल्या तालुकास्तरीय तीन दिवसीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाची आज (दि.०९) सांगता करण्यात आली.

देवरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांचे मार्गदर्शनाखाली  सुरू असलेल्या या प्रशिक्षणाला विस्तार अधिकारी ओमप्रकाश ढवळे, गटसमन्वयक धनवंत कावळे , मूल्यवर्धन तालुका समन्वयक राजेंद्र खोब्रागडे, मुख्याध्यापक दीपक कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
तिन दिवसीय प्रशिक्षणाला तालुक्यतील जि. प्. व खाजगी व्यवस्थ्यापानाच्या वर्ग १ ते ५ ला शिकविणारे सुमारे १५० शिक्षक उपस्थित होते.
या तीन दिवसीय प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून श्री लोथे, श्री मस्के, श्री शेंद्रे, श्री वलथरे, श्री राठोड, श्री गणवीर, श्री खंडाईत, श्री होनमाने व श्री लवणकर यांनी सुलभकाचे कार्य केले.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीते साठी श्री राकेश शहारे व श्री प्रमोद सिंगंनजुळे विशेष शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.

blank