23.5 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ पुरग्रस्त महाराष्ट्रासाठी ‘एक हात मदतीचा’ – श्री.संत अवलीया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी)...

पुरग्रस्त महाराष्ट्रासाठी ‘एक हात मदतीचा’ – श्री.संत अवलीया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) यांचा पुढाकार

0
28
वाशिम,दि.९ ऑक्टोबर-‘पुरग्रस्त महाराष्ट्र एक हात मदतीचा’ या उपक्रमाला प्रतिसाद देत श्री.संत वलीया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) ता. मालेगाव, जि. वाशिम, र. नं. ए-२६९ संस्थेचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ यांनी आज दि.९ ऑक्टोबर रोजी एक लाख अकरा हजार अकरा रुपये (₹१,११,१११) इतकी आर्थिक मदत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे सुपूर्द केली.
  यावेळी संस्थानचे अध्यक्ष रामेश्वर आप्पा गोंडाळ, उपाध्यक्ष उत्तमराव राठोड नाईक, सचिव रामकृष्ण राऊत पाटील, कोषाध्यक्ष अंबादास पाटील कुटे, विश्वस्त रमेश घुगे, वैजनाथ आप्पा गोंडाळ आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिक, संस्था व सामाजिक संघटनांना पुरग्रस्तांसाठी मदतीस पुढे येण्याचे आवाहनही केले. मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा, असे सांगण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्षा डॉ. नयना दरक, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक शितल इंगोले उपस्थित होत्या.
blank