गोंदिया,दि.09- जागतिक फार्मासिस्ट दिवस निमित्त फार्मसी डे कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेतील स्व.वसंतराव नाईक सभागृहात मोठ्या थाटामाटाने पार पडले. सदर कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती सुरेश हर्षे,मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे,कृषी व पशु संवर्धन विभागाचे सभापती दिपा चंद्रिकापुरे,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांचे सह आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे व आयुर्वेदीक दवाखान्यातील सर्व औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माता धन्वंतरी व माता सरस्वती यांना माल्यार्पण करण्यात आले.स्वागत गीता द्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
औषध निर्माण अधिकारी हा आरोग्य सेवेतील महत्त्वाचा घटक आहे तसेच डॉक्टर व रुग्णांमधील महत्वाचा दुवा असुन यांच्याद्वारे सामान्य रुग्णांपर्यंत समुपदेशन पासून औषध वितरणापर्यंत सर्व सेवा पुरवल्या जात असल्याचे यावेळी उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे यांनी सांगितले.तसेच औषध निर्माण अधिकारी यांनी सदैव कृतीशील राहुन रुग्णांशी संवाद साधुन आरोग्य संस्थेत औषधी व साहित्य पुरवुन त्याची नोंद व्यवस्थित ठेवणे आवश्यक असल्याचे मुकाअ मुरुगानंथम यांनी यावेळी म्हटले.जागतिक फार्मासिस्ट दिवस हा औषध निर्माण अधिकारी यांच्या सेवेच्या जागरुकतेबाबत साजरा करित असल्याचे अतिरिक्त मुकाअ डॉ. लोखंडे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात आरोग्य संस्थेतील औषध निर्माण अधिकारी यांनी आपल्या वेगवेगळ्या केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी व उत्कृष्ट सेवेसाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मांचिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले.त्यानंतर सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते औषध निर्माण द्वारे शपथ फार्मसी शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औषध निर्माता संघटना शाखा गोंदियाचे अध्यक्ष ज्योती जगणे यांनी केले तर प्रास्तविक संघटनेचे उपाध्यक्ष शरद रहांगडाले यांनी केले.जागतिक फार्मासिस्ट दिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औषध निर्माण अधिकारी संघटनेचे शरद रहांगडाले,राजेश चव्हाण,विनोद पटले,पराग साळवे,प्रविण टेकाडे,बबलु बोंबार्डे,देवेंद्र बांगरे, महेंद्र पटले,भुपेश तुरकर,राखी झंझाळ,अंजली,कांबळे,कुंभलवार,सर





