41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता दारूबंदी समितीच्या महिला अध्यक्षावर दारू विक्रेत्यांचा हल्ला

दारूबंदी समितीच्या महिला अध्यक्षावर दारू विक्रेत्यांचा हल्ला

0
223

blank

गोंदिया : गावात अवैध दारू विक्री करू नका अशी समज देणाऱ्या दारूबंदी समितीच्या महिला अध्यक्षावर दारू विक्रेत्यासह त्याच्या कुटुंबीयांनी हल्ला केला. यामध्ये अध्यक्षांसह काहीजण जखमी झाले. तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम सर्रा येथे गुरुवारी (दि. ९) सायंकाळी ही घटना घडली.
दारूबंदी समिती अध्यक्ष अरुणा सुनील उईके (४८, रा. सर्रा) यांच्या नेतृत्त्वात महिला सदस्यांनी देवानंद भीमराव गोसे आणि त्यांचे भाऊ मनोज भीमराव गोसे यांना गावात अवैध दारूविक्री करू नका, असे समजावले. यावेळी देवानंद गोसे, मनोज गोसे, संध्या, शालू, पलक, आस्था, वैष्णवी, पायल, प्रद्युम्न यांनी अचानक लाठ्या, काठी व
चाकूने अरुणा व इतर महिलांवर हल्ला केला. यात अरुणा यांच्या मान, पाठ व डाव्या गुडघ्यावर जखमा झाल्या. माया पटले, ज्योती गौतम, छन्नू कवरे जखमी झाले आहेत. त्यांना खासगी व सार्वजनिक आरोग्यसेवेत प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यांच्या पैकी छन्नू कवरे व अरुणा यांचा मुलगा राहुल सुनील उईके (१८) यांना गंभीर जखमा आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी येथे पाठविण्यात आले आहे. घटना पाहून सरपंच सिद्धार्थ कांबळे (६२) व ग्रामपंचायत सदस्य प्रवीन हेमराज राऊत (३५) मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण झाली आहे. अरुणा यांनी या आरोपींची तक्रार तिरोडा पोलिसांत केली आहे.

blank