संभाजीनगर,दि.११ः- येथील प्रतिभावान खेळाडू प्रणव कोरडे याने त्याचा साथीदार तेलंगणाचा विनीत मुत्थ्याला याच्याबरोबर आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे शुक्रवारी झालेल्या अखिल भारतीय आयटा प्रो सर्किट टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत उपविजेतेपद पटकावले.
शुक्रवार १० आँक्टोंबर रोजी आंध्र प्रदेश मधील काकीनाडा येथे नुकत्याच झालेल्या आयटा एक लाख प्रो लीग अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा प्रतिभावान खेळाडू प्रणव कोरडे याने विनीत मुत्थ्याला याच्या साथीने दुहेरीत उपविजेतेपद पटकावले.
प्रणव कोरडे व विनीत मुत्थ्याला यांनी मानांकित यशवंत गुनापल्ली आणि धीरज रेड्डी यांना 7-5 ,1-6 10-8 नमवत उपांत्य फेरीत धडक मारली तसेच या जोडीने अतिशय उच्च दर्जाचा खेळ करून स्पर्धेमध्ये सणसनाटी निर्माण केली. त्यानंतर प्रणव कोरडे व विनीत मुत्थ्याला या जोडीने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित राहुल लोकेश आणि कौशिक यांच्यावर 7-5,6-3 अशी मात केली. मात्र, अंतिम सामन्यात या जोडीला प्रथम मानांकित मुनिम दीप व सजल केशवनी यांच्याविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मुनिम दीप व सजल केशवनी यांनी अंतिम सामना 6-3, 6-4 असा जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. उपविजेतेपद पटकावणाऱ्या प्रणव कोरडे हा एक प्रतिभावान खेळाडू आहे याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या प्रणव कोरडे हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या हेतूने हैदराबाद येथील सुरेश कृष्णा टेनिस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे.
. या कामगिरीबद्दल तसेच तसेच पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड साहेब व ते छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी प्रांत अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत अदवंत, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद राष्ट्रीय सचिव आणि सीनियर कौन्सिल संजीवजी देशपांडे साहेब, डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अजय तल्हार साहेब ,मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील ॲड. अमरजीत गिरासे यांनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




