26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ आदिवासी गोवारी समाजातर्पेâ गायगोधन पर्व साजरा

आदिवासी गोवारी समाजातर्पेâ गायगोधन पर्व साजरा

0
48

छोटा गोंदिया, संजयनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया : दिवाळी सणाच्या दुसर्‍या दिवशी गोवर्धन पुजनाची परंपरा आहे. शेकडो वर्षांची परंपरा आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या वतीने जपण्यात येत आहे. दिवाळी सणाचा दुसरा दिवस (ता.२२) गोवर्धनाने साजरा करण्यात आला. त्यानुसार आदिवासी गोंड-गोवारी समाज संघटनेच्या वतीने गोंदिया जिल्हाध्यक्ष सुशील राऊत यांच्या नेतृत्वात संजय नगर, छोटा गोंदिया या ठिकाणी गायगोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी गोवारी समाज बांधवांनी पारंपरित पध्दतीने कार्यक्रम आयोजित करून गायगोधन पुजन केले.
कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष सुशील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अतिथी म्हणून गोंविद वाघाडे, डॉ.शारदा राऊत, वसंत नेवारे, नानु चचाणे, सुनिल सोनवाने, संतोष शहारे, मारोती नेवारे, सुरज जोशी, सुनिल भोयर, बबन नेवारे, मनोज नेवारे, दिपक नेवारे, नितीन शहारे, नरेश नेवारे, बिनाराम शहारे, किशोर राऊत, पुनाराम शहारे, गुन्या बोपचे, प्रेम सोनवाने, राजु शहारे, सुनिल राऊत, शैलेश राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने आदिअनादी काळापासून परंपरा पाळली जात आहे. आदिवासी संस्कृती, डार जागणी, ढाल पुजन, गायगोधन, गाव नाचणी करून दिवाळी सण साजरा केला. ही परंपरा पिढ्यानपिढ्या पासून सुरू आहे. या अंतर्गत संजय नगर, छोटा गोंदिया येथील आखरावर गोवर्धन पुजनाचे कार्यक्रम २२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात ढाल पुजन करून गोय गोधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला गोवारी समाजाचे नागरिकांसह परिसरातील महिला-पुरूषांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन टांगसे, गौरी टांगसे, नविन शहारे, ईश्वर सुरजजोशी, राजेश नेवारे, राहुल पडौती, दुर्गेश शहारे, रोहित नेवारे, आकाश राऊत, प्रियांशू नेवारे, रवि राऊत, निखिल वाघाडे, प्रविण टांगसे आदिंसह आदिवासी गोंड-गोवारी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

blank