यवतमाळ— “बळीराजा पूजन उत्सव “शिवतीर्थ (शिवाजी महाराज पुतळा), गार्डन रोड यवतमाळ येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्षांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर गायकवाड (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ) होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष साहेबराव जूनघरे,चंद्रशेखर कुडूपले,डॉ.प्रभाकर काळमेघ,कार्याध्यक्ष सुनील कडू,मार्गदर्शक प्रा.प्रवीण भोयर,जिल्हा सचिव शशिकांत खडसे, निशा बुटले जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड, आशा काळे यांची उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते नंदूभाऊ बुटे यांनी बळीराजाच्या आदर्श राज्याची संकल्पना, त्याचे सुखी व समृद्ध जीवन आणि त्याचा प्रेरणादायी जीवनप्रवास यावर सखोल विचार मांडले. या प्रसंगी इंजि.नरेंद्र गद्रे,राजू देशमुख,यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर गायकवाड यांनी महासम्राट बळीराजा महोत्सव व इतरही विषयावर मार्गदर्शन केले.
संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे यांनी कार्यक्रमाचा समारोपीय भाषणात बळीराजाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या सामूहिक संकल्प केला.आभार प्रा. पंढरी पाठे यांनी मानले.या बळीराजा महोत्सवातर्गत तीन दिवस शिवतीर्थ येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला.या प्रसंगी कोषाध्यक्ष विजय निकम,सहसचिव नीरज डफळे, मैत्री संघटनेचे ज्ञानेश्वर चौधरी,अशोक महाले, डॉ.ललित बोरकरअनिता गरड, स्नेहा निबाळकर, मेघा सरताबे,किशोर देशमुख, सचिन मनवर, संभाजी भिवकर, प्रधुम्यन जवळेकर, तुषार देशमुख,कृष्णा पुसनाके,रमेश होनाडे उदय सरताबे,मनोज ठाकरे, श्याम कोल्हे,संजय कोल्हे, विशाल चुटे,किशोर पोराटकर, शुभम दिवाने अजय देवकते,आदित्य पाटील खालील मान्यवर उपस्थित होते.





