34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय आ.भोंडेकर यांच्या नेतृ्त्वावर विश्वास १५० युवकांचा शिवसेनेत प्रवेश

आ.भोंडेकर यांच्या नेतृ्त्वावर विश्वास १५० युवकांचा शिवसेनेत प्रवेश

0
37

blank

भंडारा,दि.२४ ऑक्टोबर-भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात बेला व भंडारा शहरातील १५० पेक्षा अधिक युवकांनी तसेच तिरोडा तालुक्यातील माजी नगरसेवकांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना उपनेते तथा आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याद्वारे पाच वर्षांत भंडारा व पवनी मतदार संघात अनेक विकासकामे केली. या कामांची चर्चा पूर्व विदर्भात होऊ लागली आहे. विकास कामांसह पक्ष मजबुतीचे कार्यही जोमात सुरू आहे.
अशातच २२ ऑक्टोबरला १५० पेक्षा अधिक युवकांनी आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार भोंडेकर यांनी शिवसेनेचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. प्रवेशादरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने उपस्थित होते.

blank