39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय अमित भालेराव यांच्या सह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

अमित भालेराव यांच्या सह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
167

blank

गोंदिया,दि.२४ः-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्या लोकाभिमुख, विकासवादी धोरणांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात आज प्रभाग क्रमांक ०८ कुंभारे नगर, आंबेडकर वार्ड, गोंदिया येथे अमित भालेराव यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्षा सौ.राजलक्ष्मी तुरकर यांच्या उपस्थितीत अमितकुमार देवाजी भालेराव, श्रीमती पपिला दिनेश गेडाम,निशांत देवाजी भालेराव,गौरव गेडाम,गौतम रंगारी,प्रशांत बागडे,अतुल सातदेवें,आकाश गोस्वामी,रोहीत मेश्राम,रंजित माने सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सर्व प्रवेशीतांचे कार्यकर्त्यांनी पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्वश्री प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, विनीत सहारे, श्याम चौरे, राजेश तुरकर, विजय रगड़े, शैलेश टेंभेंकर, हर्षवर्धन मेश्राम सहित अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

blank