३५ नागरिकांकडून गाडीवर फॅन्सी नंबरचे दंड वसूल
गोंदिया : डिजिटलच्या जमान्यात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, वाहन चालविताना त्याचा वापर करणे महागात पडू शकते. तरीही, बरेच लोक गाडी चालवताना कॉल किंवा मेसेज करण्यासाठी त्याचा वापर करतात. लोक वाहन चालविताना सोशल मीडिया तपासण्यासाठीही फोन वापरतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, गाडी चालविताना मोबाइल वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला दंडसुद्धा होऊ शकतो.
गोंदिया जिल्हा पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या एकूण ५२४ वाहनधारकांना ५ लाख २४ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. वाहतुकीचे नियम मोडले म्हणून पोलिसांनी नागरिकांकडून लाखोंचा दंड दहा महिन्यांत वसूल केला आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस डिव्हाईस घेऊन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तत्पर असतात.
५.२४ लाखांचा दंड मोबाइलधारकांवर
जिल्हा वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ५३४ मोबाइलधारक चालकांना पाच लाख २४ हजार रुपये दंड ठोठावला.
यात दुचाकीचालकांसह चारचाकी
चालकही आहेत. ते मोबाइलधारक वाहनचालक अपघातांसाठी कारणीभूत ठरतात.





