24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ सौंदड ग्राम पंचायतीत १.४० कोटीचा भ्रष्टाचार

सौंदड ग्राम पंचायतीत १.४० कोटीचा भ्रष्टाचार

0
41

चौकशी समितीकडून अनियमिततेवर शिक्कामोर्तब
गोंदिया : सौंदड ग्राम पंचायतीमध्ये गेल्या काही महिन्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप आणि पारदर्शक कामामुळे होणारे पोटसुड असा आरोप-प्रत्यारोप सुरू होता. या प्रकरणात झालेल्या चौकशीनंतर सौंदड ग्राम पंचायतीच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहे. केलेल्या तक्रारीतील दहा मुद्दांच्या चौकशी दरम्यान १ कोटी ४४ लाख ४० हजार ९४४ रूपयाची अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला आहे. यात सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांचे कर्तव्यात कसूर कारणीभूत असल्याचे नमुद केले आहे. यामुळे सौंदड ग्राम पंचायतीचा भ्रष्टाचाराचा जीन पुन्हा बाटलीबाहेर पडला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्राम पंचायतीवर ९ जानेवारी २०२३ रोजी हर्ष मोदी हे सरपंच पदी आरूढ झाले. दरम्यान सौंदड ग्राम पंचायतीच्या स्थानिक राजकारण चव्हाट्यावर आले. एक वर्षानंतरच विरोधकांकडून सरपंच हर्ष मोदी यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू लागले. त्यातच सरपंच हर्ष मोदी व उपसरपंच रोशन शिवणकर हे भ्रष्टाराला घेवून आमनेसामने आले. ऑक्टोबर २०२४ मध्ये रोशन शिवणकर व काही ग्राम पंचायत सदस्यांनी खंविअ यांच्याकडे विकासकामात अनियमितता होत आहे, अशी तक्रार केली होती. तक्रारीवरून कसलीही कारवाई होत नसल्याचे लक्षात घेत उपसरपंच रोशन शिवणकर यांनी आमरण उपोषण सुरू केला. उपोषणात आश्वासन मिळाले. मात्र त्यानंतर कसलीही चौकशी झाली नाही. आंदोलनाला घेवून पुन्हा वाद उफाळून आला. सोशल मिडीयावर वार सुरू झाले. दरम्यान मुकाअ यांना चौकशी करण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे उपमुकाअ यांच्या आदेशान्वये चौकशी समिती नेमण्यात आली. समितीकडून १० तक्रारींची इतभूत चौकशी केली. चौकशी दरम्यान विविध लेखाशिर्षक अंतर्गत ग्राम पंचायतीकडून करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणता अनियमितता झाल्याची बाब अधिकार्‍यांच्या निदर्शनास आली. चौकशी समितीने आपले अहवाल जि.प.चे उपमुकाअ यांच्याकडे सादर केले. यामध्ये जवळपास १ कोटी ४४ लाख ४० हजार ९४४ रूपयाची अनियमितता झाल्याचे अभिप्रायात नोंदविले आहे. यासाठी ग्राम पंचायत सरपंच हर्ष मोदी व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी पटले हे आपल्या जबाबदारी व कर्तव्य नियमानुसार कामे केली नाहीत, असे दिसून आल्याचे नमुद केले आहे. यामुळे सौंदड ग्राम पंचायतमध्ये गेल्या दोन वर्षात विकासाच्या नावावर करण्यात आलेल्या वाज्यागाज्याची पोलखोल झाली आहे.
……………..
कर्तव्यात कसूर मानून पदमुक्त करावे : शिवणकर
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात उपसरपंच रोशन शिवणकर व त्यांचे सहकार्‍यांनी गोंदिया येथे माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. दरम्यान आपण केलेले आरोप हे सत्य ठरले. सत्य कधीही लपविता येत नाही, असत्यावर सत्याचा नेहमीच विजय होतो. हे चौकशी समितीच्या अहवालावरून समोर आले आहे. आपण केलेले आरोप सिद्द झाले आहेत. चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार ग्राम पंचायतीमध्ये गेल्या दोन वर्षात १ कोटी ४४ लाख ४० हजार रूपयाची अनियमितता झाली आहे. हा तर तक्रारीत नमुद बाबींचाच हिशोब आहे. याहून अधिक भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून ग्राम पंचायत लेखा संहिता अंतर्गत तथा महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमाच्या कलमान्वये सरपंच हर्षकुमार मोदी व तत्कालीन ग्राम विकास अधिकारी पटले यांच्यावर शिस्तभंगासह पदमुक्त करण्याची कारवाई व्हावी, अशी मागणी आपली राहणार आहे. जे सत्य होते, ते समोर आले. जनतेसमोर पारदर्शक कामाचा वाजागाजा करणार्‍यांची पोलखोल झाली आहे, असे व्यक्त करीत सौंदड ग्राम पंचायतीच्या कामाकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच गायत्री इरले, ग्रा.पं.सदस्य वैâलाश इरले, योगेश्वर निर्वाण, समाधान बडोले, हेमराज डोंगरवार, नंदकिशोर डोंगरेवार, देवदास निंबेकर, अर्चना डोंगरवार, रेखा राऊत आदि उपस्थित होते.

blank