38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ उत्कृष्ट क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजनासाठी जांभळी (दोडके) ला जिल्ह्यात प्रथम पुरस्कार

उत्कृष्ट क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजनासाठी जांभळी (दोडके) ला जिल्ह्यात प्रथम पुरस्कार

0
32

blank

 गोंदिया :जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सत्र 2025–26 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि लोकसहभागाच्या जोरावर जांभळी (दोडके), ता. सडक अर्जुनी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय महोत्सवाला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मान प्राप्त झाला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा जांभळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाची निवड सर्वोत्कृष्ट तालुका स्तरीय आयोजन म्हणून करण्यात आली.हा पुरस्कार बोंडगाव देवी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यास खासदार डॉ. प्रशांतजी पडोळे, आमदार राजकुमारजी बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मृगनाथमंथन, उपाध्यक्ष तथा सभापती (शिक्षण व आरोग्य) मा. सुरेश हर्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पंचायत समिती सडक अर्जुनीचे सभापती मा. चेतनजी वडगाये, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण धर्मराज चव्हाण, विजय सोनवाणे (उपसरपंच), राजेश सोनवाणे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, धम्मदीप साखरे व किशोर पालेवार यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

नियोजन, शिस्त व लोकसहभाग ठरला यशाचा पाया

अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या यशामागे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन, प्रचंड लोकसहभाग, भव्य उद्घाटन सोहळा, कुशल क्रीडागण, सर्वांसाठी भोजन व्यवस्था, संपूर्ण गावाची सजावट, प्रत्येक घरासमोरील रांगोळी, मोहल्ला व घर सजावट तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता या सर्व बाबींचा सुयोग्य समतोल साधण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या क्रीडा सत्राची विशेष चर्चा झाली.

सामूहिक प्रयत्नांतून यशस्वी आयोजन

हा महोत्सव जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, जिल्हा परिषद सदस्य भुमेश्वर पटले, लक्ष्मन चौहान, केंद्र प्रमुख नेतराम बीजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.सरपंच रणजिता कोराम, उपसरपंच विजय सोनावणे, ग्रामपंचायत पदाधिकारी, राजेश सोनवाणे व शाळा व्यवस्थापन समिती, महिला बचत गट, सर्व माजी पदाधिकारी, युवक वर्ग यांच्या सक्रिय सहकार्यामुळे आयोजन यशस्वी झाले.

यासोबतच मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, बी. आर. बागडे, धम्मदीप साखरे, श्यामा कुंडगिर, माया तांदळे, जितेंद्र कवरे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती, भोजन व निवास समिती तसेच युवा क्रीडा प्रेमी यांनी अथक परिश्रम घेतले.ग्रामवासींच्या एकजुटीचे फळ “ग्रामवासींचा समन्वय, श्रमदान आणि सहकार्य यामुळेच हे आयोजन यशस्वी झाले,”
असे प्रतिपादन मुख्याध्यापक किशोर डोंगरवार यांनी केले.

blank