24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ जिल्हा पुरवठा विभागाची हॉटेलवर धाड टाकून गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

जिल्हा पुरवठा विभागाची हॉटेलवर धाड टाकून गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

0
54

भंडारा,दि.30 : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा शहरातील भोजापूर रोडवरील एका प्रसिध्दी हॉटेलवर धाड टाकून अवैध गॅस सिलिंडर  जप्त करण्यात आले आहे

  भंडारा येथील जिल्हा पुरवठा कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,भोजपूर रोडवरील तमन्ना बार ॲड रेस्टॉरंटवर  येथे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे समजले त्यानुसार 29 डिसेंबर रोजी दुपारी 12.40 वाजता च्या सुमारास पुरवठा विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. तपासणी दरम्यान हॉटेलच्या किचनमध्ये घरगुती  वापराचे एच.पी कंपनीचे 1 भरलेले आणि 1 रिकामे सिलिंडर आढळून आले. हॉटेल मॅनेजरला या सिलिंडरच्या वैध वापराबाबत विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा कागदपत्रे सादर करता आले नाहीत. या कायदेशीर कारवाईत एकूण 5 हजार 414 रुपयांचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला आहे.

याप्रकरणी हॉटेल मालक गरिमा सुभाष प्रजापती, बार चालक स्वप्नील नरेंद्र गायधने आणि मॅनेजर अजित उदयलाल पटले यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५च्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     ही यशस्वी कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वात सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, खरेदी अधिकारी सुहास टोंग, निरीक्षण अधिकारी पोचीराम कापडे, वरिष्ठ लिपिक प्रमोद क्षीरसागर आणि वाहनचालक मंजू बोधनकर यांच्या पथकाने केली. अशा प्रकारच्या उल्लंघनावर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने  कळविले आहे.

blank