29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ अंत्यविधीसाठी जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्याची मागणी – पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना...

अंत्यविधीसाठी जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्याची मागणी – पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन

0
31

अर्जुनी-मोर.-अर्जुनी-मोरगाव येथेव्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी आवश्यक असलेले जळाऊ लाकूड वन विभाग व वन विकास आगार कार्यालय, अर्जुनी-मोर येथून उपलब्ध होत नसल्याची बाब निदर्शनास आणून देत,
अर्जुनी-मोर. नगरपंचायतचे सभापती दानेश मदन साखरे यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात आली आहे. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत असून मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, जळाऊ लाकूड मागणीसाठी संबंधित कार्यालयात संपर्क साधल्यास “लाकूड उपलब्ध नाही” असे उत्तर दिले जाते किंवा इतर ठिकाणच्या वन आगाराचे नाव सांगितले जाते. यामुळे गरीब व गरजू कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो.ही परिस्थिती लक्षात घेऊन अर्जुनी-मोरगाव येथील वन विभाग व वन विकास आगार कार्यालयामार्फत अंत्यविधीसाठी पुरेशा प्रमाणात जळाऊ लाकूड नियमितपणे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी अर्जुनी-मोर. नगरपंचायत चे नगरसेवक तथा अर्थ व बांधकाम सभापती दानेश साखरे यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.