32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक आत्मविश्वास, प्रामाणिकपणा,सचोटी ठेवून अध्ययन केल्यास यश नक्कीच मिळेल-संजीव कोलते

आत्मविश्वास, प्रामाणिकपणा,सचोटी ठेवून अध्ययन केल्यास यश नक्कीच मिळेल-संजीव कोलते

0
27

blank

देवरी-आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास, सचोटी,प्रामाणिकपणा ठेवून निरंतर अध्ययन करीत असेल तर भविष्यात यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथील स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी जेष्ठ साहित्यिक कवी व माजी प्राचार्य संजीव कोलते तिरोडा यांनी प्रतिपादन केले.यावेळी प्रास्ताविकेतून प्राचार्य कमल कापसे यांनी पुराडा आश्रमशाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक कार्याची माहिती दिली.तसेच येथील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात विविध अभ्यासक्रम पुर्ण करीत असल्याचे सांगत विभाग व राज्यस्तरावर नावलौकीक करीत असल्याचे सांगितले.यावेळी माजी सरपंच नितेश खोब्रागडे यांनी विद्यालयातील वर्ग १ ली ते १२ वी पर्यंतचे प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक दिले.यावेळी पोलीस पाटील सुभाष अंबादे,प्राचार्य डि.आर गिरीपुंजे,माजी सरपंच नितेश खोब्रागडे,ढिवरीनटोलाचे सरपंच दिलीप जुळा, सालेकसाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कलाकृती दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमात प्रामुख्याने पुराडा येथील सरपंच लक्ष्मीशंकर मरकाम,ढिवरीनटोलाचे सरपंच दिलीप जुळा, पोलीस पाटील सुभाष अंबादे,तिरोडा येथील बाबा बैस,पत्रकार सौ.चित्रा कापसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्णजी टप्पे, सदस्य शोभेलालजी उईके,केशव उईके,प्रा.राजेश हट्टेवार तसेच संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते, शाळेतील अधिक्षक अजय सोनुले, अधिक्षिका पौर्णिमा जोशी,वैजयंती नेनावत, वैशाली खोंडे,मेघा धोपते, नितीन मेश्राम,राजु भक्ता,पवन वंजारी, विजय टेंभरे, मोरेश्वर धवणे, सुरेखा कोरे,वर्षा सांगोळे,मयुर राठोड,मंदा देशमुख, आशा धुर्वे, ओमप्रकाश मडावी, दुर्गेश उईके, अरविंद कुथीर,खेमराज नाईक, देवेंद्र हत्तीमारे,दिपमाला लाडे,प्रदीप होळी यांनी मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा.संदिप बिसेन व माध्यमिक शिक्षिका सुजाता मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल पुनम दाढेनी मानले.

blank