तिरोडा-भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगावचे 31 विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाले.पंचायत समितीचे सभापती तेजराम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत सविस्तर मार्गदर्शन करून पुढील वर्षी हा आकडा वाढला पाहिजे दिवसेंदिवस प्रगती झाली पाहिजे असे आवाहन याप्रसंगी केले.
सुयोग्य नियोजनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होतो त्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते विद्यार्थ्यांची प्रगती होणे, त्यांनी केलेल्या चांगल्या कामांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते जेणेकरून त्यांना चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळून अधिक चांगले कार्य, प्रगती करू शकतील असे प्राचार्य डी आर गिरीपुंजे यांनी यावेळी सांगितले .
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वर्ग आठवीचे विद्यार्थी वैशाली गुड्डू राहंडाले, वैष्णवी चंद्रशेखर बोपचे ,दक्ष राजू साठवणे ,लक्स दसाराम गौतम ,समीक्षा सुरेश बोपचे, जानवी प्रशांत टेंभरे, सानवी नीलकंठ भेलावे ,हर्ष विनोदकुमार भेलावे, मयूर लच्छु रहांगडाले ,आदर्श गोवर्धन बोपचे ,नेहा अविनाश हटवार, सोनल खेमराज ठाकरे ,श्रिया जगदेव बोपचे, श्रावणी अशोक बावणे, श्रेष्ठ संदीप पारधीकर, सिद्धी हेमचंद बिसेन, खुशी संतोष कोसरे, प्रणाली प्रेमचंद चौधरी, क्रिस्टी सुखदास पटले, अरमान अमीन कच्ची, अर्श रणवीर कोटांगले, द्र्प गणेश बोपचे, आर्या सुखदेव कटरे, इशा चंद्रप्रकाश बोपचे, इशिका घनश्याम पटले ,अथर्व महेंद्रकुमार मेश्राम ,रुद्र राजकुमार बिसेन, पूजा प्रकाश भगत,मुस्कान किशोर पटले ,आयुष सुनील टेंभरे, आयुष अमृत साठवणे यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य तसेच शिक्षक वृंदांना दिले आहे कार्यक्रमाचे संचालन विवेक बन्सोड ,प्रास्ताविक प्राचार्य डी आर गिरीपुंजे ,आभार प्रदर्शन कुमारी एस पी भगत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख जी एन बीसेन विषय शिक्षक ए बी राठोड ,जे सी लांजेवार ,आर एस मेश्राम, एस पी टेंभरे ,उत्कर्ष बोरकर, नंदा बोरकर, गायत्री बिसेन, नामदेव अटकुलवाड, व्ही व्ही मेश्राम ,अनिता उपरीकर, रोशनी बिसेन, एस एम कटरे, संगीता वालदे यांनी मोलाचे सहकार्य केले.





