23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home गुन्हेवार्ता मोरगाव अर्जूनी नजीक अपघात- एक ठार,दोन जखमी

मोरगाव अर्जूनी नजीक अपघात- एक ठार,दोन जखमी

0
275

गोंदिया,दि.२५- अर्जूनी मोरगाव तालुक्यातील देऊळगाव बोदरा जंगल परिसरात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.

मृताचे नाव मंगेश शिवणकर (वय ४०) राहणार ढिवरखेडा (पालांदूर) असे आहे. जखमींमध्ये दिगंबर जयदेव मडावी (वय ३०) राहणा माहुरकुडा आणि गजेंग्र मारोती मेश्राम (वय२७) यांचा समावेश आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले असून पुढील चौकशी सुरू आहे.

blank