27.3 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ कन्हारटोला येथे रस्ता बांंधकामाचे भूमिपूजन

कन्हारटोला येथे रस्ता बांंधकामाचे भूमिपूजन

0
70

गोरेगाव,दि.०७- तालुक्यातील पिंडकेपार अंतर्गत येत असलेल्या कान्हारटोला येथे  रेल्वे स्टेशन रोडच्या बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती डाॅ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीची सोय अधिक सुलभ होणार आहे. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, नाल्या व इतर मूलभूत सुविधा निर्माण करणे हे आपले ध्येय असून परिसरात जास्तीत जास्त विकास कामे कशी करता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्या शितलताई बिसेन, माजी पं.स.सभापती सुरेंद्र बिसेन, ग्रा.पं. सदस्य नीलकंठ बिसेन, बाबा भाऊ बिसेन, हिरदिलाल बिसेन संजय गालपल्लीवार, शिवा बिसेन,लोकेश टेंभरे,काशीराम टेंभरे,राजेश देशमुख,आनंदराव रहांगडाले,खोमेंद्र बिसेन तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank