24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ महाप्रज्ञा बौद्ध विहार येथे जागतिक महिला दिवस साजरा

महाप्रज्ञा बौद्ध विहार येथे जागतिक महिला दिवस साजरा

0
114

तिरोडा : येथील महाप्रज्ञा बौद्ध विहार, रेल्वे चौकी तिरोडा येथे महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती, तिरोडा च्या वतीने जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून दिनांक ८ मार्च रोजी कार्यक्रम साजरा करण्यात आला .

या प्रसंगी कार्यक्रमाला डॉ. कुमुद संदीप मेश्राम, नगर परिषद सदस्या तिरोडा, तसेच ऍड. सुप्रिया पवन वासनिक, विधी सल्लागार मुख्य अतिथी म्हणून तर महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष महेंद्र बडगे, सचिव प्रवीण चव्हाण, संघटक पवन वासनिक, कोषाध्यक्ष संजय जांभुळकर, उपाध्यक्ष लंकेश टेंभेकर, सल्लागार सुरेश बन्सोड, सहकोषाध्यक्ष राहुल बडगे, सहसंघटक जयकुमार बन्सोड, कार्यकारणी सदस्य मनिंद्र बन्सोड पवन वाघमारे, सत्यवान चौधरी, दीपक चव्हाण, प्रवीण नंदागवळी, सुजाता डोंगरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे सर्व बौद्ध उपासक, उपासिका व उपस्थित मान्यवर यांच्या तर्फे पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती माई सावत्री बाईफुले , क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारत रत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर, महाकाऋणिक तथागत गौतम बुद्ध, त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर, राज्य माता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. कुमुद संदीप मेश्राम, नगर परिषद सदस्या तिरोडा, ऍड. सुप्रिया पवन वासनिक, विधी सल्लागार, श्रीमती सुजाता डोंगरे, श्रीमती मेश्राम ताई, श्रीमती धामेचा ताई यांचे महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीतर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव प्रवीण चव्हाण यांनी तर सर्व उपस्थितांचे आभार संघटक पवन वासनिक यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले..