24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ पवार महिला समितीतर्पेâ आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

पवार महिला समितीतर्पेâ आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

0
60

पवार सांस्कृतिक भवनात कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया : पवार प्रगतिशील मंच व श्री प्रगतिशील शिक्षण संस्था, गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली पवार महिला समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कन्हारटोली येथील पवार सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ.मैथुला बिसेन होत्या. तर कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय पवार महासभेच्या महिला अध्यक्षा श्रीमती केसरबाई बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ.मंजूषा हरिणखेडे, राष्ट्रीय सचिव सौ.दिव्या तुरकर, राष्ट्रीय सहसचिव सौ.विमल कटरे, राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष सौ.मेघा बिसेन, सौ.रश्मी रहांगडाले, डॉ.प्रतिभा पारधी, डॉ.स्विटी बघेले, डॉ.पायल बघेले, डॉ.गीतिका पारधी, डॉ.चायना बिसेन, डॉ.दिशा कटरे, डॉ.पायल चौधरी, डॉ.वर्षा रहांगडाले, डॉ.पायल कटरे, डॉ.पूजा बोपचे, डॉ.साक्षी बिसेन, डॉ.हर्षा रहांगडाले, पवार प्रगतिशील मंचाच्या सौ.उर्मिला रहांगडाले, सौ.उपमा गौतम, सौ.धनिशा कटरे, सौ.छाया पटले, सौ.चेतना चौहान, सौ.हिना चौधरी व सौ.सोनाली रहांगडाले आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य व सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी भाषणे व महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातून महिलांनी समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेत प्रगतीचा मार्ग अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पवार महिला समितीच्या अध्यक्षा सौ.आरती तुरकर यांच्या नेतृत्वाखाली सौ.राजलक्ष्मी हरिणखेडे, सौ.संतोषी रहांगडाले, सौ.स्नेहा कोल्हे, सौ.स्वाती चौहान, सौ.चेतना कटरे, सौ.माही तुरकर, सौ.निलु रहांगडाले, सौ.सोनू बिसेन, सौ.मंजू पटले व सौ.कल्पना बिसेन यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.