26.4 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ महिलांचा सन्मान राखला पाहिजे : अॅड. माधुरी रहांगडाले

महिलांचा सन्मान राखला पाहिजे : अॅड. माधुरी रहांगडाले

0
37

तिरोडा- देशाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महिलांना मानाचे स्थान मिळाले पाहिजे. महिलांचा सन्मान हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य अॅड. माधुरी रहांगडाले यांनी व्यक्त केले.
सुपर वूमन परिवार, तिरोडा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त “सुपर वूमन अवॉर्ड” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड होत्या. यावेळी विणा रहांगडाले, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, जिल्हा परिषद सभापती रजनी कुंभरे, डॉ. पशीने, प्रकल्प अधिकारी शिल्पा येडे व डॉ. काळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.कार्यक्रमात महिलांनी विविध वेशभूषा, नृत्य सादरीकरण तसेच विविध प्रकारचे स्टॉल लावून सहभाग नोंदविला