28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home मराठवाडा/खान्देश जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन हॉटेलवर छापा टाकुन घरगुती सिलिंडर जप्त, गुन्हा दाखल..

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन हॉटेलवर छापा टाकुन घरगुती सिलिंडर जप्त, गुन्हा दाखल..

0
61
बीड-हॉटेलमध्ये व्यावसायिक सिलेंडर ऐवजी घरगुती सिलेंडर वापरले जात असल्याची जिल्हा पुरवठा विभागाला जाग आली आहे.. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तीन हॉटेलवर धाड टाकून घरगुती सिलेंडर जप्त करून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हॉटेल व्यावसायिक हे हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर केला जात असल्याची बातमी जिल्हाधिकारी यांनी पुरवठा विभागाला सांगून कारवाई केली.. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या रॅकेटचा परदा पाश झाला आहे..
अमेरिका-इस्त्रायल व इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचे वितरण बंद झाले आहे. असे असताना बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील श्री हॉटेल, समाधान हॉटेल व रायगड हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात असल्याची माहिती बीड तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार संबंधित तिन्ही हॉटेलवर छापा टाकला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना या हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडर आढळून आले. सदरील सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.