26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home गुन्हेवार्ता पोलिसांचे वाहन आणि कारमध्ये समोरासमोर टक्कर, सहा जखमी

पोलिसांचे वाहन आणि कारमध्ये समोरासमोर टक्कर, सहा जखमी

0
81

चामोर्शी : चामोर्शीवरून आष्टीकडे खासगी कारने जात असलेल्या तीन पोलीस अंमलदारांच्या वाहनाची समोरून येणाऱ्या कारसोबत टक्कर झाल्याने त्या कारमधील तिघांसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. हा अपघात सोनापूर फाट्याजवळील वळणावर झाला.प्राप्त माहितीनुसार, आष्टीकडे निघालेल्या पोलिसांच्या एमएच 33, एडी 204 या कारमध्ये हवालदार सुमन डफाडे (रा.बोलेपल्ली), अंमलदार देवेंद्र लोहंबरे आणि देवीदास नागोसे (दोघेही रा.हेडरी) असे तिघे होते. तर समोरून येणार्‍या एमएच 31, सीएस 3886 या कारमध्ये दादू राजेश (रा.अकोला), जय रामप्रसाद राठोड (रा.यवतमाळ) आणि संकेत निखुरे (रा.गडचिरोली) असे तिघे होते.

दोन्ही वाहने वेगात होती. त्यामुळे ही धडक टाळण्याच्या प्रयत्नात पोलिसांची कार धडकेनंतर अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या शेतात शिरली. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी धावाधाव करून जखमींना रुग्णवाहिकेतून चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले.सोनापूर फाट्यावर यापूर्वीही चार ते पाच अपघात झाले आहेत. त्यामुळे या धोकादायक वळणावर भविष्यात अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

blank