28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ वैनगंगा कृषीधारा महोत्सव तथा नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनीचा प्रारंभ २० मार्चपासून

वैनगंगा कृषीधारा महोत्सव तथा नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनीचा प्रारंभ २० मार्चपासून

0
37

भंडारा दि.17 कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान “वैनगंगा कृषीधारा महोत्सव २०२६ तथा नव तेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनी” चे आयोजन “रेल्वे मैदान, नुतन महाराष्ट्र शाळेजवळ, खात रोड, भंडारा” येथे करण्यात आले आहे.याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आत्मा संचालक उर्मिला चिखले व उपसंचालक अजय राऊत उपस्थित होते.

वैनगंगा कृषीधारा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २० मार्च २०२६ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,यांचे हस्ते व  पालकमंत्री डॉ. पंकज भोयर,    भंडारा यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. पहिल्या दिवशी माविमतर्फे पुरुष सुधार सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये आधुनिक कृषि यंत्रसामग्री, कृषि निविष्ठा, (बियाणे खते व कीटकनाशके), कृषी क्षेत्रातील AI तंत्रज्ञान व ड्रोनचा वापर तसेच स्वयं सहायता महिला बचत गटांनी उत्पादित विविध उत्पादनांचे स्टॉल असतील. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेंतर्गत उद्योजक लाभार्थ्यां करीता खरीददार विक्रेता संमेलन व शेतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, माविम मित्र मंडळ यांचे पुरुप सुधार सन्मान सोहळा ही आयोजित करण्यात येणार आहे.

परिसंवाद व चर्चासत्र मध्ये नैसर्गीक शेती, सेंद्रिय शेती भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, प्राथमिक अन्नप्रक्रिया उद्योग, सुक्ष्म सिंचन उद्योग, कृषि पुरक उद्योग (पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय), आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त पर्व महिला सक्षमीकरणाचे, आहार तज्ञांचे मार्गदर्शन व पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

नैसर्गिक व सेंद्रिय शेती पिक विविधीकरणासाठी पर्यायी पिकांची लागवड तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन इत्यादी विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन तसेच सर्व शासकीय यंत्रणांकडील योजनांची माहिती येथे एका छताखाली उपलब्ध होईल.

नव्याने सुरू झालेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन व ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही येथे उपलब्ध असणार आहे.तरी शेतकरी बंधू भगीनी साठी माहितीपूर्ण असणाऱ्या या महोत्सवात जास्तीत जास्त शेतकरी, महिला, ग्राहक व नागरीकांनी भेट द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार  भंडारा यांनी केले आहे.

महोत्सवाचे उदघाटन 20 मार्च रोजी होणार असून 21 मार्च रोजी अन्नप्रक्रीया परिसंवाद, तसेच शेतकरी-खरेदीदार संवाद (B2B Meeting) यासोबत सास्कंतिक कार्यक्रम.22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमीत्त पर्व महिला सक्षमीकरणाचे हा परिसंवाद  आणी आहारतज्ञाचे मार्गदर्शन व इतर कार्यक्रम.

23 मार्च रोजी पशुसंवर्धन ,दुग्धविकास कुकुटपालन,मस्त्यव्यवसाय  ,तंत्रज्ञान, सुक्ष्म सिंचन, सास्कंतिक कार्यक्रम.24 मार्च रोजी नैसर्गिक शेती ,सेंद्रीय शेती,प्रगतीशील शेतकरी यांचे अनुभव कथन.उत्कृष्ट शेतकरी पीक स्पर्धा विजेत्यांचे सत्कार सोहळा.या महोत्सवात जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, विविध बँका, कंपन्या आणि तज्ज्ञांचा सहभाग असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.