
सडक अर्जुनी,दि.१३- तालुक्यातील कोकणा / जमी. येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार ईंजी. राजकुमार बडोले यांच्या हस्ते व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार बडोले यांनी “ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देत गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा निर्धार आहे,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमांतर्गत शाळा व अंगणवाडी परिसरात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे तसेच स्मशानभूमी परिसरात नवीन हातपंपाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना अंतर्गत नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील स्वच्छता व पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सिमेंट नाली बांधकाम, कोकणा ते कवलेवाडा मार्गावरील सिमेंट रस्ता, स्मशानभूमी परिसरात वृक्षलागवड व कुंपण, तसेच हातपंपावर सौरऊर्जेवर आधारित सोलर पंप बसविणे अशा विविध कामांचा समावेश आहे. या कामांमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय होणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.
या प्रसंगी लायकराम भेंडारकर (जि.प. अध्यक्ष), चेतन वडगाये (सभापती, पं.स. सडक अर्जुनी), सपना नाईक (पं.स. सदस्य), शिवाजी गहाणे (पं.स. सदस्य), शिलाताई भेंडारकर (माजी सभापती), लोकचंद कापगते (माजी पं.स. सदस्य), ईश्वर कोरे (उपाध्यक्ष, वि.का. से.स.सं.), पराग कापगते (उपसरपंच, धाबेटेकडी), नेतराम देशमुख (माजी सरपंच), खेमराज भेंडारकर (अध्यक्ष, शा.व्य.स.), आदित्य ठाकरे (गट विकास अधिकारी), बनसोडजी (उपविभागीय अभियंता), रेवदास दरवडे (तंटामुक्ती अध्यक्ष), अमरदीप रोकडे (प्रशासक), मोरेश्वर राऊत (माजी उपसरपंच), धर्मराज लंजे (ग्रामविकास अधिकारी) यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





