गोंंदिया,दि.१२ः महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न” करीता जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी भूषण बुराडे, सपोनि किशोर मावस्कर,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर व पैरवी अधिकारी यांना राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.त्यांच्या या उत्कृष्ठ कार्याबद्दल पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षकासंह इतरांनी अभिनंदन केले आहे.





