31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आक्षेपार्ह,अश्लील व जीवे मारण्याची धमकी देणारे आ.संजय गायकवाड यांना अटक करा -भाकपा

आक्षेपार्ह,अश्लील व जीवे मारण्याची धमकी देणारे आ.संजय गायकवाड यांना अटक करा -भाकपा

0
36

गोंदिया-शिवसेना (शिंदे सेना) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी रात्री आल इंडिया स्टुडंटस फेडरेशनचे माजी राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांना गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या संदर्भात फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली आहे या विरोधात सम्पूर्ण महाराष्ट्रात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात त्यांच्या अटकेची व आमदार पदाच्या राजीनाम्याची मागणी साठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी व इतर डावे, पुरोगामी पक्ष व जसंघटनाच्या नेतृत्वात मोठे आंदोलन होत आहेत याच पार्श्वभूमी वर आज 28 एप्रिलला बुलढाणा येथील गायकवाडच्या जनसंम्पर्क कार्यालयावर व मुंबईत शिवाजी पार्क वर इंडिया आघाडी घटक पक्षाच्या, जनसंघटना व सामाजिक संघटना मोठं आंदोलन करत आहेत या विषयावर भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने उप विभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्रीच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले या शिष्टमंडळात कॉ. हौसलाल रहांगडाले, कॉ. मिलिंद गणवीर, कॉ. रामचंद्र पाटील, गुणवंत नाईक व सुरेश रंगारी यांचा समावेश होता.या आमदाराने भूतकाळामध्ये अशीच गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये केली आहेत. एकूणच त्यांचे वर्तन हे आमदार म्हणून अशोभनिय व महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंक लावणारे आहेत.म्हणून त्यांचेववर गुन्हा दाखल करुण त्यांना अटक करने व आमदारकीचा राजीनामा घेण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने केली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज हे तुझ्या आईचा नवरा होते काय’?असे वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.“शिवाजी कोण होता?” हे पुस्तक इतिहासाचा चिकित्सक व अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडणारे असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे विवेकी व पुरोगामी विश्लेषण करते. समाजात वैज्ञानिक दृष्टी, समता आणि ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याची प्रेरणा देणारे हे महत्त्वपूर्ण लेखन आहे. तसेच या अगोदर 1926 रोजी प्रबोधनकार ठाकरे यांनी असेच चिकित्सक पुस्तक दगलबाज शिवाजी या नावाने लिहिले. त्याचबरोबर गणेश कुऱ्हाडे या लेखकांनी 1939 रोजी “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक लिहिले होते.जेव्हा खऱ्या अर्थाने प्रशांत कोरटकर, गोविंद गिरी, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात तेव्हा संजय गायकवाड सारखे लोक हे हेतू पुरस्सर मूग गिळून गप बसलेले असतात.
तथापि, आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रचार-प्रसारावरून प्रशांत आंबी यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, तसेच जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे, महापुरुषांचा अपमान करणे व महिलांविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरणे, हे अत्यंत निंदनीय व कायद्याच्या विरोधात आहे.म्हणून आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा,त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी, जातींमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे व महिलांविषयी अश्लील वक्तव्य करणे या गंभीर गुन्ह्यांखाली तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी, गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये आमदार संजय गायकवाड यांची सखोल चौकशी करण्यात यावी,लोकशाही व्यवस्थेत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही राज्याचे मुख्यमंत्री सह गृह मंत्र्याची असून हे नेहमी प्रमाणे अश्या गुन्हेगारांना वाचविण्याचे कार्य करीत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने केला आहे.