37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता ४ लाखाचा मेथॉडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर जप्त,शहर पोलिसांची कामगिरी

४ लाखाचा मेथॉडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर जप्त,शहर पोलिसांची कामगिरी

0
94

blank

गोंदिया,दि.०३ःअवैद्य धंद्यावर कारवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असता गोपनिय बातमिदाराकडुन खात्री लायक मिळालेल्या माहीतीच्या आधारे गोंदिया शहर पोलिसांच्या पथकाने संजयनगर परिसरात धाड घालून ४ लाख ४३ हजार रुपये किमतीचा १९.७ ग्रॅम मेथॉडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर जप्त करीत आरोपीला ताब्यात घेतले.ही कारवाई शहर पोलीस निरिक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.अटक केलेल्या आरोपीचे नाव असलान ऊर्फ बाबु इकबाल खान, रा. शास्त्री वार्ड, संजयनगर गोविंदपुर गोंदिया असे आहे.सदर मुद्देमाल हा त्याचे राहते घरी आढळून आला. एम.डी. पावडर हे अंमली पदार्थ बाळगुन विक्री करीत असल्याची माहिती मिळताच वरीष्ठांच्या आदेशाने पोनि. सा, पोलीस स्टाप, दोन शासकिय पंच, फोटोग्राफर, वजन काटा मापारी व रेड करीता लागणारे साहीत्य सोबत घेवुन शासकिय वाहन व खाजगी वाहनाने शास्त्री वार्ड, संजयनगर गोविंदपुर गोंदिया येथे पोहचुन नामे असलान ऊर्फ बाबु इकबाल खान, रा. शास्त्री वार्ड, संजयनगर, गोविंदपुर, गोंदिया याच्या घराची शहानिशा करुन त्याच्या घरासमोर जावून आवाज दिला असता हजर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव असलान ऊर्फ बाबु इकबाल खान, वय २१ वर्षे, रा. शास्त्री वार्ड, संजयनगर, गोविंदपुर, गोंदिया असे सांगितले. त्याचे हजेरीत त्याच्या घराची घरझडती घेतली असता घरझडतीत बेडरुम मध्ये दक्षिण-पश्चिम कोप-यात असलेल्या एका लोखंडी पेटीमध्ये एका कापडी गुलाबी रंगाच्या पिशवीत एका लहान स्टीलच्या डब्यात एका पारदर्शक प्लॉस्टीक पॉलीथीन मध्ये मळकट रंगाचा पावडर दिसुन आला. त्यास आम्ही सदर इसमाच्या घरझडतीत मिळून आलेल्या पावडरबाबत पंचासमक्ष विचारणा केली असता त्याने सदरचा पावडर हा मेथॉडान एम.डी. क्रिस्टल पावडर असल्याचे सांगितले. मिळुन आलेला अंमली पदार्थ मेथोंडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर चे वजन केले असता त्याचे वजन १९.७ ग्रॅम असुन २२,०००/- रु प्रति ग्रॅम प्रमाणे ४,३३,४०० रु. व विवो कंपनीचा मोबाईल किंमती १०,०००/- रु असा एकुण ४,४३,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी असलान ऊर्फ बाबु इकबाल खान, रा. शास्त्री वार्ड, संजयनगर गोविंदपुर गोंदिया याचेविरुध्द पो. स्टे. अप क्रं. ३६०/२०२६ कलम ८ (क), २२ (ब), एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा तपास पोनि/किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात सपोनि/वैभव गेडाम हे करीत आहेत.
सदरची कामगीरी गोरख भामरे पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे अपर पोलीस अधिक्षक,साहील झरकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, स.पो.नि. वैभव गेडाम, डी.बी. पथकाचे पो.उपनि. अनिल डोंगरवार, सफो/कवलपालसिंग भाटीया, पोहवा/सुदेश टेंभरे, दिपक राहांगडाले, निशिकांत लॉदासे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, पो.शि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, विजय बिसेन यांनी केली आहे.

blank