
नागपूर -शहरातील पत्रकार विजय खवसे यांच्यावर नागपूर पोलिसांनी केलेल्या अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे गेल्या महिन्यात तक्रार दाखल केली होती.त्याबाबत प्रत्यक्ष चौकशी आजपासून सुरू करण्यात येत आहे.
याबाबत दिल्ली येथील “राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगा”कडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशी संदर्भात विजय खवसे यांना नुकतीच एक सूचना (नोटीस) प्राप्त झाली आहे. आयोगाने यापूर्वी नागपूर शहरच्या पोलिस आयुक्तांना तीन नोटिसा बजावल्या होत्या, परंतु त्यावर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. मात्र आता या गंभीर प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.





