26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा-विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा-विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

0
93

· गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

गोंदिया, दि. 8 :  नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज गोंदिया जिल्ह्याचा दौऱ्यावर होत्या यावेळी जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा असे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरंगनाथम, उपवनसंरक्षक पवन कुमार जोंग, निवासी उपजिल्हाधिकारी भय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रशासकीय प्रकरणे, शेतीविषयक योजनांची सद्यस्थिती, ग्रामीण भागातील विकासकामे, पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन तसेच रोजगारनिर्मितीच्या संधी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्हा प्रशासनाने कामकाजाला अधिक गती देण्याची आवश्यकता व्यक्त केली. जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

blank