23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home शैक्षणिक दहावी परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्हा विभागात दुसरा

दहावी परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्हा विभागात दुसरा

0
51

गोंदिया, ता. ८ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. ८) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के इतका लागला असून, जिल्हा नागपूर विभागात दुसरा आहे. उल्ल्खनीय म्हणजे, यंदाही विद्यार्थिनीच गुणानुक्रमे टक्केवारी समोर आहे.

गोंदिया येथील सी.एम. पटेल हायस्कुलची विद्यार्थींनी सपना सुहास सुखदेवे हिने 99.60 % (498/500)गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर अर्जुनी मोरगाव येथील जी एम बी इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा योगेंद्र गौतम हिने ९८ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर दहावी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनादेखील होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर केला. गतवर्षीची परंपरा कायम राखत विद्यार्थिनी यंदाही टक्केवारीत समोर आहेत. जिल्ह्यात एकूण १८ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. यापैकी १८ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात नऊ हजार ७९८ विद्यार्थी, तर नऊ हजार ३० विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी आठ हजार ११४ विद्यार्थी, तर आठ हजार ३७७ विद्यार्थिनी असे एकूण १६ हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८२.८१, तर विद्यार्थिनींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.७६ इतकी आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थिनी समोर राहिल्या. जिल्ह्यात गोंदिया तालुका टाॅप ठरला असून, या तालुक्याचा एकूण निकाल ८९.२९ टक्के आहे, तर गोरेगाव तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजेच ८०.६९ टक्के इतका निकाल आहे.

तालुकानिहाय निकाल… (टक्केवारीत)

गोंदिया ः ८९.२९,आमगाव ः ८६.०८,अर्जुनी मोरगाव ः ८९.१२,देवरी ः ८०.६९,गोरेगाव ः ८८.४६,सडक अर्जुनी ः ८८.६९,सालेकसा ः ८४.२३,तिरोडा ः ८९.२३

इंदिरा कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव येथील निकाल 95.95

तिरोडा- दहावीचा स्टेट बोर्डाचा निकाल लागलेला असून त्यात इंदिरा कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव येथील निकाल ९५.९५ % लागलेला असून 99 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत, 41 विद्यार्थी प्रथम श्रेणीत ,24 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 08 विद्यार्थी तृतीय श्रेणीत असे 96 उत्तीर्ण होऊन 95.95% शाळेचा निकाल लागलेला आहे.विद्यालयातून व केंद्रातून प्रथम अक्षरा राजकुमार शहारे 91.80% द्वितीय योगिता सुनीलकुमार पटले ८९.४०% तृतीय जयश्वी अरुण उके 87.40% कोयना भुनेश्वर क्षीरसागर 84.40% चौथा समिक्षा वाय.सोनेवणे ८४.००% ५वीशिवम तीर्थराज पटले 83.00% 6वे श्रद्धा एन. क्षीरसागर 83.00% 6वासाक्षी लक्ष्मीचंद लिल्हारे 82.80% वामयुरी पारधी ८२.४०% ८वी गुण प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्य व शिक्षक वृंदांना दिले असून विद्यार्थ्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.

भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील निकाल ९३.५१%

तिरोडा-वर्ग दहावीचा स्टेट बोर्डाचा निकाल लागलेला असून त्यात भिवरावजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील निकाल ९३.५१ % लागलेला असून 108 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 40 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत, 43 विद्यार्थी प्रथम श्रेणीत ,16 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 02 विद्यार्थी तृतीय श्रेणीत असे 108 उत्तीर्ण होऊन 93.51% शाळेचा निकाल लागलेला आहे.विद्यालयातून व केंद्रातून प्रथम ऋतू रूपराज ठाकरे 94.80 % गुण प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डी.आर.गिरीपुंजे व शिक्षक वृंदांना दिले असून विद्यार्थ्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.

blank