OUT OF SYLLABUS प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचा संताप अनावर!
भंडारा,दि.१४ः महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) मार्फत दिनांक ०४ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या K SCHEME CIVIL ENGINEERING 6TH SEMESTER च्या “MAINTENANCE AND REPAIR STRUCTURE” विषयाच्या परीक्षेत OUT OF SYLLABUS प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान या चुकीच्या प्रश्नाबद्दल विद्यार्थ्यांना ४ गुण बोनस स्वरुपात देण्याची मागणी शिवसेना ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण कंळबे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कळंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पेपरमधील प्रश्न क्र. ३ (D) हा अधिकृत अभ्यासक्रमाच्या बाहेरील असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अचानक आलेल्या या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून त्यांच्या निकालावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या गंभीर प्रकाराविरोधात शिवसेना ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व पूर्व विदर्भाचे अध्यक्ष प्रवीण डी. कळंबे यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडे संबंधित OUT OF SYLLABUS प्रश्नासाठी सर्व विद्यार्थ्यांना ४ गुण BONUS स्वरूपात देण्यात यावे,अशी ठाम मागणी केली आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे.




