24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ भोजशाला निकालाचा जल्लोष;जयस्तंभ चौकात आतिशबाजी

भोजशाला निकालाचा जल्लोष;जयस्तंभ चौकात आतिशबाजी

0
816

गोंदिया : मध्यप्रदेशातील धार येथील चक्रवर्ती सम्राट महाराजा भोज यांनी निर्माण केलेली पवित्र ‘भोजशाला’ ला घेवून न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत भोजशाला हे सनातन आस्था आणि संस्कृतीचे केंद्र असल्याचे मान्य करत सत्याची पुनर्स्थापना केली आहे. या ऐतिहासिक निकालाच्या समर्थनार्थ आणि स्वागतासाठी राष्ट्रीय पंवार क्षत्रिय महासभेच्या वतीने या निर्णयाला ‘न्यायपर्व’ आणि ‘धर्म विजय उत्सव’ म्हणून आज (ता.१८) स्थानिक जयस्तंभ चौकात ‘विजयोत्सव आतिशबाजी करून साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त करीत समाज एकतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
मध्यप्रदेशातील धार येथील चक्रवर्ती सम्राट महाराजा भोज यांनी निर्माण केलेली पवित्र ‘भोजशाला’ ही सनातन आस्था, ज्ञान आणि माता वाग्देवीची (सरस्वती) तपोभूमी राहिली आहे. या संदर्भात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने १५ मे २०२६ रोजी ऐतिहासिक निकाल देत भोजशाला हे सनातन आस्था आणि संस्कृतीचे केंद्र असल्याचे मान्य करत सत्याची पुनर्स्थापना केली आहे. तसेच, लंडन येथे नेलेली देवी सरस्वतीची मूर्ती परत आणून तिची भोजशालेत पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वपूर्ण आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या ऐतिहासिक निकालाच्या समर्थनार्थ आणि स्वागतासाठी राष्ट्रीय पंवार क्षत्रिय महासभेच्या वतीने या निर्णयाला ‘न्यायपर्व’ आणि ‘धर्म विजय उत्सव’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर, आज १८ मे रोजी सायंकाळी गोंदियातील जयस्तंभ चौक येथे या ‘विजयोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी
पंवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष यु.टी. बिसेन, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी जि.प.सभापती संजयसिंह टेंभरे, न.प. उपाध्यक्ष संतोष पटले, ह.भ.प. ठाकूर गुरूजी, अ‍ॅड. टी. बी. कटरे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, प्रा. किशोर भगत,अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, केतन तुरकर, शिशिर कटरे, योगेश ठाकरे, राजकुमार पप्पू पटले, मंजुषा हरिणखेडे, भागचंद रहांगडाले, महेंद्र बिसेन, देवचंद बिसेन यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवार प्रगतीशील मंच, शिक्षण संस्था, पंवार स्वर्गरथ समिती आणि राजाभोज उत्सव समिती आदींनी प्रयत्न केले.

blank