24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ आदिवासी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे काळाची गरज -चेतन वळगाये

आदिवासी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे काळाची गरज -चेतन वळगाये

0
68

सडक अर्जुनी -तालुक्यातील डव्वा येथे आदिवासी समाज संघटना व आदिवासी हलबा हलबी समाज संघटना डव्वाच्या वतीने समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला.त्यात प्रथमतः गावात भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर ध्वजारोहण करुन क्रांतीसुर्य विर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला व सर्व थोर महापुरुष यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुन फरेन्द्र कुतीरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यात अध्यक्ष म्हणून गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव कीरसान साहेब सह उद्घाटक अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले. द्वीप प्रज्वलक देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार  संजय पुराम, विशेष अतिथी म्हणून माजी आमदार सहेषराम कोरोटे,वाय सी.भोयर,भरत मडावी, चेतन वळगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी, महेन्द्र दिहारी क्रुषी अधिकारी,सावंत बापु राऊत अध्यक्ष हलबा हलबी समाज संघटना देवरी,भरत घासले अध्यक्ष हलबा हलबी समाज संघटना गोरेगांव,बी. डी.खांडवाये, जयेंद्र राऊत गटविकास अधिकारी देवरी, नामदेवजी किरसान साकोली,मधुकरजी कुरसुंगे गुरुजी, प्रा.रमेश येल्ले, भंडारी साहेब, रुपविलास बापु कुरसुंगे माजी जि.प.सदस्य,किरणताई गावराणे माजी जि.प.सदस्य , सुनिल घासले उपसरपंच,नेहरुजी उईके पोलिस पाटील,दामीनीताई गावळ महिला अध्यक्ष,रामचरण राऊत अध्यक्ष पळसगांव,सेवकबापु राऊत मोकाशीटोला, डव्वा येथील ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई कुरसुंगे,छायाताई येल्ले, डिलेश्वरी कुरसुंगे,संगीताताई घासले,शेखरजी कुरसुंगे, पळसगांव येथील पोलिस पाटील सौ.कुरसुंगेताई,देवेंद्र गावराणे, राजेश भोयर उपसरपंच पळसगांव,नरेश प्रधान उपाध्यक्ष तंटामुक्त समिती, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाजाला योग्य प्रबोधन केले.प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सडक अर्जुनी चे सभापती चेतन वळगाये यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, आपल्या समाजात बोगस लोकांचा समावेश होऊ नये यासाठी आदिवासी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन संघर्ष करणे आता काळाची गरज आहे.असे मत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी समाज संघटना व आदिवासी हलबा हलबी समाज संघटना डव्वा, कर्मचारी संघटना,युवा संघटना चे सर्व पदाधिकारी महिला संघटनेच्या पदाधिकारी व सर्व समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संचालन योगेश ईळपाते,प्रास्ताविक मधुकरजी गावराणे यांनी तर आभार मयुर देवरे यांनी मानले.

blank