23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home गुन्हेवार्ता ट्युशनला निघालेल्या विद्यार्थिनीला टँकरने चिरडले,साखरीटोला मार्गावरील घटना

ट्युशनला निघालेल्या विद्यार्थिनीला टँकरने चिरडले,साखरीटोला मार्गावरील घटना

0
239

सालेकसा,दि.१८ः- तालुक्यातील गांधीटोला येथील रहिवासी असलेली मोनाली (मोहिनी) संतोष मेंढे ही विद्यार्थिनी, १८ मे रोजी सकाळी साधारण ६:४५ वाजता आपल्या मैत्रिणींसोबत ट्युशन क्लासला जाण्यासाठी सालेकसा-तिरखेडी-साखरीटोला या मार्गावरून प्रवास करत असताना, एका पेट्रोल टँकरने तिला धडक दिली. या भीषण धडकेमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दररोजप्रमाणेच शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या मोनालीच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण गावावर सध्या शोककळा पसरली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून ट्युशनला गेलेल्या या तरुणीच्या मृत्यूमुळे मेंढे कुटुंब शोकात बुडाले आहे. अपघाताची बातमी मिळताच, परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते आणि प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये असलेला तीव्र संतापही यावेळी स्पष्टपणे दिसून येत होता.या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तक्रारी प्राप्त होऊनही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोमवारी घडलेल्या या अपघातानंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

blank