24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home राजकीय आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

0
38

गोंदिया-महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (संलग्न आयटक) तर्फे आज कडक्त्या उन्हात जिल्ह्यातील आशांनी गोंदिया जिल्हा परिषद व कलेक्टर कार्यालयावर धडक मोर्चा काढून आपल्या मागण्याकडे शासनाचे व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव कॉ. शालूताई कुथे व राज्य संघटक व जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. रामचंद्र पाटील यांचे नेतृत्वात निघालेल्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर 25 पासून राखडलेला मानधन त्वरित अदा करा,वय 70 पेक्षा अधिक असलेल्या लाभार्थीची यादी, आधार अपडेट, इत्यादी आन लाईन कामाची सक्तीवर रोक, दर महिन्याच्या 5तारखे पर्यंत एकत्रित व नियमित मानधन देने,जो पर्यंत शासनाकडून अत्याधुनिक अँड ड्राईड मोबाईल, सिम कार्ड व, वर्षभर पुरेल एवढे डेटापॅक दिला जात नाही तो पर्यंत मातृऍप वर आशा सेविकांना आन लाईन कामाची सक्ती करू नये, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त कंत्राटी कर्मचारी प्रस्ताव मंजूर करा, 60 वर्षात सेवा निवृत्त करण्याचे आदेश रद्द करा व अश्या कर्मचाऱ्यांना दरमहा 5 निर्वाह भत्ता द्या व सेवा निवृत्तीची वय 65 करा,प्रधान मंत्री मातृवंदन योजनेचा मागील 2वर्षाचा भत्ता देने, शासकीय सेवेत कायम करणे, 6महिन्याची मानधनसह प्रसूती रजा सह 17 मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात व जिल्हाधिकारी यांना व जि प चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शिष्टमंडळाच्या वतीने सादर करण्यात आला. मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा कॉ. शालू कुथे व कॉ. रामचंद्र पाटील यांनी दिला या वेळी आयटकचे राज्य सचिव कॉ. मिलिंद गणवीर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले, या आंदोलनात प्रामुख्याने उषा बारमाटे, माया कोरे, कल्पना डोंगरे, शोभा वघारे, रेणुका राऊत, रेखा कान्हेकर, पुस्तकला रहांगडाले, संघमित्रा मेश्राम, भाविका साठवणे,शिल्पा राऊत,सविता उरकुडे, पुष्पा बहेकार विमल मानकर, गीता मानकर आदी आशा गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येत मोर्चा आंदोलनात शामिल होते.

blank